Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalaya
महाविद्यालय स्थापनेनंतर मराठी भाषा आणि साहित्याचे अध्ययन आणि अध्यापन करणारा विभाग आरंभ काळात नव्हता. या विभागाची उणीव होती. प्रत्यक्षात मराठी विभाग २००६ साली स्थापन झाला. समाजदृष्टी आणि समाजशिक्षण विकसित होण्यात भाषाभ्यासाचा सहभाग फार महत्त्वाचा ठरतो, अशी स्थापनेमागची भूमिका आहे. मराठी विभागात दरवर्षी मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा होतो. यामध्ये ग्रंथदिंडी, विविध अभ्यासक, तज्ज्ञांची व्याख्याने, लेखकांशी संवाद, मुलाखती, चर्चा, अभिवाचन, काव्यवाचन तसेच ग्रंथ प्रकाशन इत्यादि विविध उपक्रम साजरे केले जातात.